आपला जिल्हाक्राईम

केज बीड रोडवर मोटार सायकल व कारचा अपघात

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज-बीड रोडवरील पिंपळगाव फाट्या जवळ मोटार सायकल आणि एका कारचा अपघात झाला. अपघातात मोटार सायकल वरील दोघे जखमी झाले आहेत.

रविवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवरील पिंपळगाव फाट्या जवळ मोटार सायकल आणि एका कारचा अपघात झाला. त्या अपघातात मोटार सायकल वरील श्रीहरी गायकवाड आणि प्रभाकर दशरथ गदळे हे दोघे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघाता नंतर कार चालक हा भरधाव वेगाने पळून जात होता. परंतु लोकांनी त्या गाडीचा पाठलाग करून धडक देऊन पळून जाणारी कार आणि त्याच्या चालकाला नांदूरफाट्या जवळ ताब्यात घेतले आहे. तर अपघातातील जखमी श्रीहरी गायकवाड आणि प्रभाकर दशरथ गदळे यांना १०८ क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेतून आणून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार केले. त्या नंतर पुढील उपचारासाठी जखमींना बीड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळते.

तर अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहोचले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!