आपला बीड जिल्हाक्राईम

बीड जिल्ह्यातील चंदन तस्करांचे धाबे दणाणले ; पंकज कुमावत यांची चंदन चोरा विरुद्ध धाडसी कारवाई ! २० लाखांचे चंदन घेतले ताब्यात

एक चंदन चोर ताब्यात तर एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

सिंघम आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दतील चंदन चोरा विरुद्ध धाडसी कारवाई करीत २० लाख ७२ हजार रु. चा मुद्देमाल जप्त करून दहा चंदन तस्करा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दि. २३ जुलै शनिवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी येथे अशोक रामहारी घरत याने त्याच्या स्वतःचे फायदा करिता बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणून त्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा हा चोरटी विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच सिंघम आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब आणि त्यांच्या पथकातील पोलीस जमादार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, अमजद सय्यद, राजू वंजारे, रामहरी भंडाने, संजय टूले, शिवाजी कागदे, दीपक जावळे, महिला पोलिस नाईक आशा चौरे यांनी सायंकाळी ६:०० वा. महाजनवाडी येथे छापा मारला.

त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा एक इसम जागीच मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अशोक रामहारी घरत रा. महाजनवाडी असे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात ५ क्विंटल ९९ किलो चंदनाचा तासलेला गाभा यासह लाकडे, वजन काटा, वाकस, कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण २० लाख ७२ हजार ७०० हजार रुपयाचा माल जप्त केला असुन यात दहा आरोपी विरूद्ध हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!