वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांचे लेखनिक म्हणून काम केलेले आणि अनेक गंभीर गुन्ह्याच्या तपासात सहभाग असलेले अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अभ्यासु असलेले पोलिस नाईक अशोक नामदास यांची माजलगाव येथे बदली झाली आहे.

त्या निमित्त त्यांना केज पोलिस आणि नागरिकांच्या वतीने निरोप देण्यात आला.
मागील काही वर्षा पासून पोलिस नाईक अशोक नामदास हे केज पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकारी यांचे लेखनिक म्हणून काम करीत होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या कार्यकाळात त्यांनी केज पोलीस ठाण्यात काम केले आहे. पोलीस नाईक अशोक नामदास हे अत्यंत शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष तर आहेतच परंतु अत्यंत मितभाषी आणि अभ्यासू व कामात चोख त्यांनी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यां सोबत काम करताना खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, चोऱ्या, दरोडा आणि वाटमारी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करून त्यांचे दोषारोप न्यायालयात सादर करणे आणि कायद्यांचा अभ्यास करून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून चोख काम बजावले आहे त्यांच्या मदतीने झालेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाल्या आहेत. तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
दरम्यान अशोक नामदास यांची केजहुन माजलगाव येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्या निमित्त त्यांना केज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि सर्व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने निरोप देण्यात आला. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, राजूभाई इनामदार, इनामदार, साखरे यांच्यासह केज आणि परिसरातील अनेक नागरिक, पत्रकार, व्यावसायिक आणि त्यांचे सहकारी यांनी भेट घेऊन त्यांना निरोप दिला.