आपला बीड जिल्हा

केजच्या केजडी नदीला आला माशांचा महापूर !

मासे बघायला लोकांची तोबा गर्दी !

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज तालुक्यातुन वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला असून नदी पात्रातील जिवंत मासे पाहण्यासाठी आणि धरण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

केज तालुक्यांतील शेलगाव गांजी गावा लगतच्या वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुला जवळच्या नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखे चित्र पहावयास मिळत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच पडलेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होत आहे. तसेच मांसाहारी लोकांची देखील मासे पकडण्यासाठी गर्दी होत असून अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्यांचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदिला माशांचा पूर आल्या सारखे अत्यंत मनमोहक आणि मनाला मोहून टाकणारे दृश्य तयार झाले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!