आंदोलनआपले केज

केज तहसीलवर रिपाइं (अ) चा समता मोर्चा धडकला

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील विविध मागण्या घेऊन केज तहसीलवर रिपाइं (ए) चा समता मोर्चा धडकला.

या बाबत वृत्त असे कि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिपान हजारे यांच्या मार्गदर्शन , नेतृत्वाखाली आरपीआय केज तालुकाध्यक्ष सुनिल हिरवे , तालुका कार्यध्यक्ष ईश्वर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केज तहसिल कार्यालयावर दि १६ जून रोजी असंख्य भिमसैनिकांच्या उपस्थितीत मोर्चा धडकला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला पुष्पहार व अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली असंख्य भिमसैनिकांनी घोषणाबाजी करत सकाळी ११ वाजता हा मोर्चा केज तहसिलवर येऊन धडकला , मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी महाराष्ट्र शासनाने २०११ पर्यंतची झोपडपट्टी, घरकुल व गायरान धारकांना कायदेशीर नोटीस देऊन, सुनावणी घेऊन, अतिक्रमणे कायम करावीत असे सकारात्मक आवाहन बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मा. संदिपान हजारे यांनी केले तर सुनिल हिरवे , महेंद्र निकाळजे यांनी देखील मनोगत व्यक्त केले केज तहसिलचे नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांना एप्रिल १९९० पूर्वी ज्यांनी गावराणावर अतिक्रमण करून अद्यापर्यंत उपजिवीका करणाऱ्या गायराणधारकांच्या नावे ७/१२ नोंद करणे याव्यात तसेच गायराण जमिनीवरील अतिक्रमण केलेले २०१० पर्यंतचे अतिक्रमण नियमीत करावेत. पारधी समाजाला घरकुल बांधकाम करण्यासाठी गायराण जमिन उपलब्ध करून द्यावी तसेच त्या घरकुलाला रक्कम ५०००००/- रु. देण्यात यावेत. या बरोबरच केज येथील गायरान जमिन स.नं ३०/१,२ येथील रमाई नगर, दलितांनी बांधलेले घरे यांचे नावे पिटीआर नोंद करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र मिळाल्यापासुन अक्षय भालेराव तरूणाचा कट्टर जातीयवादी गावगुंडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली अशी म्हणुन तलवारीने व चाकुने वार करून हत्या केली बाबत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. यासह आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले . सदरील निवेदनावर आरपीआय जिल्हाकार्यध्यक्ष संदीपान हजारे , केज तालुकाध्यक्ष सुनिल हिरवे , तालुका कार्यध्यक्ष ईश्वर सोनवणे, आरपीआय मराठा आघाडी तालुकाध्यक्ष सुनील बसवर , उपाध्यक्ष नवनाथ तपसे , महेंद्र निकाळजे , राजेभाऊ डोंगरे , सुभाष हजारे , हिराचंद काळे , संजय शिंदे , भारत गायकवाड , नितीन गायकवाड , विलास वाघमारे , सचिन ठोकळ , सर्जेराव शिनगारे , सुरेश गायकवाड , सुर्यकांत शिंदे , अंबादास तुपारे , अतुल खोचे , विजय सोनवणे , सुधाकर सोनवणे , उमोल मस्के , भिमराव मस्के , सिंमीता गायकवाड , रेखा आंदिच्या सह्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!