वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केज तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2022 चा निकाल अतिशय धक्कादायक लागला असुन त्यामध्ये सर्वसामान्य मतदारांनी दिग्गांजाना पराभूत करून त्यांचे पाणीपत केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायत पैकी ६४ ग्रामपचायतची प्रत्यक्षात निवडणुक असुन त्यांचा निकाल आज दिनांक २० डिसेंबर रोजी अतिशय धक्कादायक पद्धतीने लागला असुन सर्वसान्य मतदारांनी खऱ्या लोकशाहीला जन्म घातला असल्याचे या निकाला तुन स्पष्ट झाले आहे. तसेच यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी धनशक्तीला जनशक्तीने मातीत गाडले आहे व सर्वसान्य उमेदवाराला भरघोस मतदानाचे दान देऊन भल्याभल्या दिग्गजांना पराभवाची धुळ चारली आहे यात अनेक सत्ताधारी राजकीय पिंडाचे वलय असणारे अनेक दिग्ग्ज सत्ताधारी प्रस्थापिथ ज्यांच्या हाती तालुक्याची आणि जिल्ह्याची धुरा होती त्यांना देखील मतदाराने चपटी बोटीला व प्र लोभनाला आणि अमिशाला बळी न पडता लोकशाहीच्या माध्यमातुन पराभवाचा धक्का दिला आहे.
तर ज्यांनी ज्यांनी केज नगरपंचायात निवडणुकीत येऊन ढवळाढवळ केली त्यांना गावातील मतदारांनी धुळ चारत गाववेशीतच रोखले गेले असे सर्व स्तरातुन बोलले जात आहे. तर जनतेने मात्र लक्ष्मी ला कोठे ही थारा न देता सरळ सरळ गोर गरीब सर्व सामान्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालुन गावाचा कारभारी म्हणुन ग्रामपंचायतची खुर्ची बहाल केली आहे .
👇 YOUTUBE CHANNEL 👇