वादळवार्ता / केज
दि.24 सप्टेंबर रोजी पंकज कुमावत सहा. पोलीस अधीक्षक केज यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फ़त माहिती मिळाली की, मुळ नेकनूर गावात रामेश्वर खिंडकर नामक व्यक्ती महाराष्ट्र शासनाने विक्री, साठा व वाहतूक साठी प्रतिबंधित केलेला गुटखा,त्याची विनापरवाना अवैध रित्या साठा करून चोरटी विक्री करीत आहे.अशी खात्रीपूर्वक माहिती मिळण्याने त्यांनी त्यांचे पथकातिल पोलीस अंमलदार यांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पथकातील कर्मचारी यांनी नेकनूर येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे रामेश्वर खिंडकर नामक इसम मिळून आला.त्याच्या घराचे समोर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये दोन पंचासमक्ष झडती घेतली असता तेथे विविध कंपनीचा पान मसाला, गुटखा,सुगंधित तंबाखू, व जर्दा मिळून आला.त्याची एकूण किंमत 5,66,666 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अंमलदार दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरून रामेश्वर खिंडकर रा.नेकनूर ,सतीश जाधव रा. चौसाळा ,आबा मुळे रा.बीड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई मा.पंकज कुमावत सहा.पोलीस अधीक्षक केज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डापकर, गित्ते,मंदे महिला अंमलदार चौरे,होमगार्ड गदळे व ठोंबरे यांनी केली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!