विशेष

ग्रामपंचायतीला ग्रासभेसाठी असणारे बंधनकारक नियम – माहिती असायलाच हवी

वादळवार्ता विशेष माहिती

गाव गाड्याचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतला ग्रामसभा घ्यावी लागते त्या ग्रामसभेचे महत्वपूर्ण नियमावली द्वारे कार्य करावे लागते व त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी लागते .

खालील प्रमाणे ग्रामपंचायतला नियमांच्या अधिन राहुन जबाबदारी युक्त कामे करावी लागतात ती अशी .

१ )ग्रामसभेपूर्वी एक दिवस अगोदर महिलांची सभा घेणे बंधनकारक आहे .

२ )महिला सभेचे स्वतंत्र इतिवृत्त लिहिणे बंधनकारक आहे .

3 )महिलांच्या सभेत मंजूर झालेले ठराव मुख्य ग्रामसभेत जसेच्या तसे मंजूर करावी लागतात .

४ ) ग्रामपंचायतच्या सदस्यांनी त्यांच्या वार्डात ग्रामसभेपूर्वी वार्ड सभा घेणे बंधनकारक आहे .

५ )ग्रामसभेत ऐनवेळी एखाद्या विषयावर चर्चा व्हावी असे वाटत असेल तर तसे निवेदन दोन दिवस अगोदर सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे लेखी द्यावे .

६ )ऐनवेळी चा विषय ग्रामसभेत चर्चा व ठरावासाठी नाकारल्या नंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी त्याचे सकारण लेखी स्पष्टीकरण निवेदनकर्त्यास द्यावे .

वरिलप्रमाणे सभेचे कामकाज न झाल्यास गावचा रहिवाशी , मतदार तक्रार दाखल करू शकतो .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!