आपला बीड जिल्हाक्राईम

केज-बीड रोडवर चारचाकी विस्टा गाडीचा व दोन मोटार सायकलचा भिषण अपघात; दोघे ठार तर दोघे जखमी

वादळवार्ता – शेख शाकेर (नेकनुर )

राष्ट्रीय माहामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाल्यापासून केज – बीड रोडवर सातत्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज दि ५ जुन रोजी दुपारी २ .३० ते ३ च्या दरम्यान नेकनुर परिसरात कांही अंतरावर भिषण अपघात झाला असुन त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नेकनुर पासुन कांही अंतरावर असणाऱ्या गुलाम सागर तळ्याजवळ श्री कालिका प्रतिष्ठान माऊली मंगल कार्यालयाच्या कांही अंतराव चारचाकी विस्टा गाडीचा क्र MH.17 V 9697  तसेच पॅशन प्लस MH20 CN 4015 व हॉन्डा शाईन गाडी क्र. MH23 AZ5810 चा भिषण अपघात झाला असुन दोघा जंनाचा जागीच मृत्यु झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले असुन जखमींना रुग्णवाहिकेतून नेकनुर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!