वादळवार्ता वार्तांकन – केज
शेतीच्या कामातुन घरी परतत असताना केज – बीड रोडवर बजरंगनगरच्या समोर धडक देऊन पलायन ,केज पोलीस ठाण्यामध्ये आज्ञान व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सविस्तर वृत्त असे कि केज शहरामध्ये वास्तव्यास असलेले मुखीमोदीन हमीदोद्दीन खतीब मुजफोरोद्दीन हमीदोद्दीन खतीब हे दोघे भाऊ आपल्या शेतीतील कामे आटपुन आपल्या मोक्र.MH44-M6063 (होन्डा शाईन कंपनीच्या मोटार सायकलवरून ) घराकडे परतत असताना केज – बीड येथील बजरंग वस्तीच्या समोर आपल्या दिशाने जात असताना समोरून राँग साईडने येणारी मोक्र.MH14-DQ7776 लाल रंगाची बुलेट या कपंनीच्या मोटार सायकलस्वाराने चालत्या गाडीला जोराची धडक देऊन त्या ठिकाणाहुन पलायन केले आहे . याआपघातामध्ये मुजफोरोद्दीन हमीदोद्दीन खतीब हे जखमी झाले असुन केज पोलीस ठाण्यामध्ये बुलेटस्वारा गु.र.नं.450/2022 कलम 279,337,338 भादवि सह कलम 177/134 मोवाका प्रमाणे आज्ञात मोटारसायकलस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. सोनवणे हे करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!