नारायण शिंदेंना पाहताच ना. मुंडेंनी त्यांना कवटाळले
वादळवार्ता – शेख शाकेर
संपूर्ण राज्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले लोकनेते आ. धनंजय मुंडे यांची राज मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल बालाघाटावर मांजरसुंबा येथे ना. धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या मित्रमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न भुषतो भविष्याती असा डोळ्यांचा पारणं फेडणारा जंगी स्वागत करण्यात आला आहे. जिवलग मित्राचा व जनतेचा अभूतपूर्व प्रेम पाहून ना. मुंडे गहिवरून गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वर आभाळ रुपी प्रेम करणाऱ्या जनतेचा नम्रता पुर्वक आभार मानले आहे. 
ना. धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यात बीड जिल्ह्य़ातील जनतेचा व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्या नंतर आज प्रथमच त्यांचे आगमन बीड जिल्ह्य़ात झाले आहे. आष्टी पासून ते परळी पर्यंत जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. मांजरसुंबा येथे येताच ना. मुंडे यांनी नारायण बाप्पा शिंदेंना कवटाळले हा क्षण पाहण्यासारखा होता.
बालाघाटावर मांजरसुंबा येथे नारायण बाप्पा शिंदे यांचे अभूतपूर्व नियोजन
बालाघाटावर कोणताही कार्यक्रम असो नारायण बाप्पा शिंदे यांच्या नियोजनाला तोड नाही हे त्यांचे विरोधक सुध्दा म्हणतात त्यात ना. धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम असला तर ते मित्र प्रेमापोटी त्यांच्या स्वागतासाठी काय काय करु त्यांना आभाळही छोटे वाटतात ना. धनंजय मुंडे यांच्या जंगी स्वागताची गेल्या चार दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती संपूर्ण बालाघाट परिसरात सैकडो होर्डिग्ज, बॅनर, पक्षाचे झेंडे लावून नेकनुर व मांजरसुंबाचा परिसर सजवण्यात आला होता. ना. धनंजय मुंडे यांचे मांजरसुंबा येथे आगमन होताच प्रचंड आतषबाजीने ढोलताशांच्या गजरा मध्ये व अनेक जेसीबी च्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर आपल्या जिवलग मित्राचा स्वागत क्रेनच्या साह्याने भलामोठा हार घालून करण्यात आला आहे.
ना. धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
ना. धनंजय मुंडे यांच्या स्वागताचा सोहळा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या ऐजनतेचा जणू ओढा लोटला होता बालाघाटावर अशी गर्दी कै. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर आज तेही मुंडे कुटुंबीयांचे ना. धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमात दिसुन आली आहे.
बजरंग बाप्पा, नारायण बाप्पा, गवते बापु कडुन ना. मुंडेंचे स्वागत
बालाघाटावर मांजरसुंबा येथे बीड विधानसभा व केज विधानसभा या दोन मतदारसंघातील संगम असलेल्या मांजरसुंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्य़ाचे नेते येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बाप्पा सोनवणें, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे, जेष्ठ नेते बबनराव गवते बापु यांनी ना. धनंजय मुंडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, बजरंग बाप्पा सोनवणें, मा. आ. संजय दौंड,वाल्मिक कराड, राजेश्वर चव्हाण, बाळा बांगर, नाना महाराज कदम, अविनाश नाईकवाडे, शरद झोडगे, अरुण काका रसाळ, सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई,गंगाधर काळकुटे, जेष्ठ नेते सय्यद मोहिब भाई, शिवाजी शिंदे, शंकर पैलवान तसेच बालाघाटातील विविध गावचे सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, चरमॅन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांची अभूतपूर्व अशी गर्दी जमली होती.
गर्दीत सोन्याची चेन अनेक मोबाईल व रोख रक्कम चोरी
ना. धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी जमलेल्या तुफान गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला असून नारायण बाप्पा शिंदे यांच्या मुलाच्या गळ्यातील साडेअकरा तोळे ची सोन्याची चेन, चार पाच जणांनाचे मोबाईल, तर नेकनुर येथील बाळु सावंत यांच्या खिशातील साडे सहा हजार रोख चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात ह्या चोर्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. नेकनुर पोलीसांच्या कामाविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!