आपला बीड जिल्हा

कृषी उद्योगातून ग्रामीण विकासाला चालना मिळेल…डॉ. बाबासाहेब ठोंबरे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय लातूर. 

वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन शिबिर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी समारोपीय सत्राकरिता मार्गदर्शक म्हणून लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती प्रमुख मार्गदर्शक म्हणून होती. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट हे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले, की “वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी कृषी विकासाला चालना देत उद्यमशीलता बाळगावी. यातून स्वतःचा आणि समाजाचा विकास होण्यास अधिक मदत होईल. देशाच्या प्रगतीसाठी ग्रामीण भागाचा विकास होणे अतिशय आवश्यक बाब आहे त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सुटण्यास मदत होईल व ग्रामीण भागातील माणसाचे जगणे अधिक सुकर होईल”, असे विचार व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी “वाणिज्य शाखेतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण गुणवत्तेने घेऊन या संधी प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हावे.”असे मार्गदर्शन केले.

सात दिवस चाललेल्या या साप्ताहिक उद्बोधन शिबिरात सुरत विद्यापीठ गुजरात, डॉन बॉस्को युनिव्हर्सिटी गुवाहाटी आसाम, इंदौर युनिव्हर्सिटी मध्य प्रदेश, तसेच पंजाब राज्यातील विद्यापीठांमधून विविध प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य विषयाशी संबंधित आधुनिक प्रवाहावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ इंद्रजीत भगत यांनी केले. तर श्रीपाद कदम व डॉ रामेश्वर जगदाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य जबाबदारी पार पडली. तांत्रिक व कार्यक्रमाच्या सांकेतिक स्थळाची जबाबदारी कार्यालयीन कर्मचारी श्री अली शेख यांनी पार पाडली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. इंद्रजीत भगत (वाणिज्य शाखाप्रमुख) यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी शर्मा व कुमारी सुमती माने तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चि. उत्तरेश्वर यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमाला उपप्राचार्य रमेश शिंदे, डॉ मुकुंद राजपंखे, रामेश्वर जगदाळे, अमोल सोळुंके, प्रा नरेंद्र चोलेले, प्रा अमोल सोळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!