वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील शिंदी येथे घरात प्रवेश करून कपाट उघडून त्यातील दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, शिंदी ता. केज येथे अरुण अनुरथ जाधव हे पुण्याला गेल्याची संधी साधून त्यांच्या घरात चोरट्याने प्रवेश केला. घरातील लोखंडी रॉडने कपाटाचा दरवाजा उचकटून ड्रॉव्हर मधील मंगळसूत्र, बोरमाळ, झुमके, नथ, अंगठी, पत्ता चैन असे ७१ हजार रु. चे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
या प्रकरणी अरुण जाधव यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु र नं ३९३/२०२२ भा दं वि ४५४ आणि ३८० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश आघाव हर पुढील तपास करीत आहेत
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!