आपला बीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या…

वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे

=========================

गेवराई तालुक्यातील जय भवानी शिक्षकेेत्तर कर्मचाऱ्याने  भाडोत्री राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि.10 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या गेवराई तालुक्यातील गढी येथे उघडकीस आली . यामुळे परिसरात खळबळ उडाली.

या कर्मचाऱ्यावर फुलसांगवी या गावी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.

शिरूर कासार तालुक्यातील मौजे फुलसांगवी या गावाचे रहवाशी असलेले सुभाष भानुदास जायभाये हे जयभवानी संस्थेवर क्लार्क म्हणून कार्यरथ होते.गेल्या काही दिवसापासून ते गढी येथे भाडोत्री घरामध्ये राहत होते. या भाडोत्री घराच्या आसपास दुर्गंधी येऊ लागल्याने या घरामध्ये  पाहणी केली असता सुभाष जायभाये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरामध्ये दोराला लटकलेला आढळून आला.

या घटनेची माहिती दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी फुलसांगवी गावाकडे समजल्यावर गावभर शोककळा पसरली आहे. मृतदेहाचा पंचनामा करून गेवराई पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जास्त वेळ ठेवणे उचित नसल्याने रात्री उशिरा सुभाष जायभाये यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मयत सुभाष जायभाये यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र उशिरा पर्यत कळले नव्हते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!