तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नगर पंचायत मध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे
” पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ! ”
वादळवार्ता– गौतम बचुटे
जुनी पेन्शन योजना सुरू करण्यार यावी. या मागणीसाठी केज सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत केज मधून रॅली काढली.
जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी बेमुदत संपाचा दुसरा दिवस आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या तहसील कार्यालय, शिवाजी चौक, भवानी चौक, मंगळवार पेठे, दर्गा मार्गे तहसील कार्यालया पर्यंत कर्मचाऱ्यांनी रॅली काढली, रॅलीत पेन्शन आमच्या हक्काची; नाही कुणाच्या बापाची आणि एकच मिशन; जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. त्या नंतर तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालये रिकामी असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!