सामाजीक
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचं दर्शन!
वादळवार्ता – केज
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणत गर्दी असल्यामुळे मोजक्यानाच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले होते.