दैनिक वादळ वार्ता/सचिन भालेराव
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत भगवा सप्ताहाचे आयोजन शिवसेना नेते आमदार सुनीलजी प्रभू साहेब मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर साहेब उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केज विधानसभा व परळी विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे.
सदरील भगवा सप्ताहात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान,शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा,बुथ प्रमुख गट प्रमुख शाखाप्रमुख मेळावे, नवीन मतदार नोंदणी,सह शिवसेना आपल्या दारी अभियान जेष्ठ शिवसैनिक सत्कार विविध प्रश्नांवर आंदोलन सह अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करून भगवा सप्ताहात राबविण्यात येणार आहेत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक तयार करून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरून पुन्हा एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी माहिती दिली आहे……