वादळवार्ता – केज
काल दि.२५ मे रोजी नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला त्यामधे केज येथील
प्रा विश्वनाथराव कराड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निकालाची परंपरा कायम राखली
१) सरवदे प्रतीक बाळासाहेब ८७.३३ सर्वप्रथम २) गुळभिले साक्षी रमेश ८३.८३ द्वितीय ३) केदार कार्तिक बाबासाहेब ८३.५० तृतीय ४) घुले आकांक्षा व्यंकट ८०.६७ चतुर्थ हे विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेत ही १) गव्हाणे अक्षय स्वरूप ७३.३३ सर्वप्रथम २) भावे ममता मल्लिकार्जुन ७२.१७ द्वितीय ३) शिंदे सुरज सुभाष ६७.३३ तृतीय ४) वडकर आशा ज्ञानोबा ६३.५० चतुर्थ
कला शाखेमध्ये ३५ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत कला शाखेचा निकाल ८० टक्के लागलेला आहे आणि विज्ञान शाखेचे ७६ विद्यार्थी परिक्षेस बसलेले होते त्यापैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत विज्ञान शाखेचा निकाल 94 टक्के लागलेला असून कला व विज्ञान शाखेचा एकूण निकाल ८७% लागलेला आहे विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विक्रम बप्पा मुंडे यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष माननीय विजयकांत मुंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थेचे सचिव महादेवराव मुंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या संस्थेचे सहसचिव माननीय अतुलदादा मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कॉलेजचे पर्यवेक्षक घुले व्ही आर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती माधुरी ताई विजयकांत मुंडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!