आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

केळगाव – बेळगाव बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस ; गावकऱ्यांचा वाढता पाठींबा

वादळ वार्ता – केज

केज तालुक्यातील केळगाव – बेलगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचीत महिला सरपंच सौ. प्रणिता खंडेराव चौरे सह ग्रामस्थ ग्रांम पंचायत येथे विविध न्यायीक मागण्या घेऊन उपोषणास बसले असता पंचक्रोशीतील नागरीकांचा आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात उपोषणास पाठिंबा मिळत आहे. सदरील उपोषणामध्ये केळगाव – बेलगाव ग्रुप -ग्रांमपंचायतीची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासह आदिमागण्या घेऊन गावच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उपोषण अंदोलनाच्या माध्यमातून प्रणिता खंडेराव चौरे यांच्यासह ग्रामस्थ लढत आहेत.

या त्यांच्या गावाच्या हितासाठी , विकासाठी असनाऱ्या लढ्याकडे प्रशासन लक्ष देईल का ? केळगाव – बेलगावची होत असलेली बदनामी थांबेल का ? गावचा ठप्प पडलेला विकास सुरु होईल का ? आदि प्रश्न पंचक्रोशीतील नागरीकांना पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!