वादळवार्ता – गौतम बचुटे
शेतात पाळी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर शेतातील विजेचा खांब तुटून वीज वाहक तारा शेतकरी व बैलांच्या अंगावर पडल्याने दोन बैल जागीच ठार तर पाळी घालणारा शेतकरी जखमी झाला आहे.
या बाबतची।माहिती अशी की, केज तालुक्यातील तुकुची वाडी येथे दि. २१ मार्च रोजी दुपारी २:०० दरम्यान पांढरीचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या सर्व्हे नंबर २९१ मधील शेतात रामराव विठ्ठल मोराळे हे शेतात पाळी घालीत असताना शेतातील खांब तुटून त्याच्यावर लावलेली वीज वाहक तार ही शेतकरी व बैलाच्या अंगावर पडली. त्यात दोन्ही बैल जागीच मृत्यू पावले तर शेतकरी रामराव विठ्ठल मोराळे हे जखमी झाले आहेत. जखमी शेतकरी रामराव मोराळे त्यांच्यावर धारूर येथे उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती जखमी रामराव मोराळे यांचा मुलगा अशोक मोराळे यांनी केज पोलीस ठाण्यात दिल्या वरून या अपघाताची नोंद केज पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!