आपला बीड जिल्हाक्राईम

धनेगाव आणि चंदन सावरगाव येथे दोन गावठी दारू अड्ड्यावर पोलीसांच्या धाडी

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या पथकाची कारवाई

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील धनेगाव आणि चंदनसावरगाव येथे गावठी दारू अड्ड्यावर धाडी टाकल्या.

या बाबतची माहिती अशी की, युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे आणि त्यांचे सहकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हेत्रे, बाळासाहेब घोरपडे महिला पोलिस कॉन्स्टेबल वाळके यांनी दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा. च्या दरम्यान मौजे धनेगाव कॅम्प येथे महिला नामे रेखा विलास पवार ही तिच्या घरा समोर मोकळ्या पटांगणात विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी हातभट्टीची दारुची चोरटी विक्री करीत असल्याच्या मिळालेल्या माहिती वरून तेथे अचानक छापा मारला आणि मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कुंडलिक सिरसाट यांच्या तक्रारी वरून रेखा विलास पवार हिच्या विरुद्ध गु. र. नं. १७९/२०२२ मुंबई दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) नुसार कारवाई केली आहे.

तर दुसऱ्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या आदेशाने शेंडगे आणि राठोड यांनी चंदन सावरगाव येथे दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वा. च्या दरम्यान चंदनसावरगाव येथे बँस स्टन्डच्या रोड़चा जवळ पत्र्याचे शेडमध्ये महादेव आनतंराव काळे हा त्याचे पत्र्याचे टपरीमध्ये विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी दारु स्वत : चे ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या वरून पोलिसांनी खाजगी वाहनाने जाऊन पंचासह खाजगी वाहनाने अचानक जावुन छापा मारला असता दारू विक्री करणारा महादेव अनंतराव काळे हा जागीच मिळुन आला. सदर ठिकाणची पंचासमक्ष पाहणी करता त्याचे टपरीमध्ये वायरच्या पिशवीमध्ये अवैद्यरित्या ठेवलेली गावठी दारू मिळुन आली.

पोलिसांनी मुद्देमाल तांब्यात घेत; या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शेंडगे यांच्या तक्रारी वरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात महादेव अनंत काळे याच्या विरुद्ध गु. र. नं. १८०/२०२२ मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!