वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज गावठाण शेतातील व तांबवा, सोनिजवळा या गावाला गेली तीन ते साडे तिन महिन्यापासून विज पुरवठा बंद आहे .
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार असून अधिकार्यांच्या हालगर्जी पनामुळे तीन महिण्यापासुन विज बंद आहे . विज पुरवठा तात्काळ चालु करण्याची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
विज खंडीत आसल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरातील वीज पुरवठा करण्याकरिता लोकांची समज काढण्यासाठी कमी कॅपिसिटी ट्रान्सफॉर्मर बसून विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्याची समज काढली आहे, विधुत पंप चलत नसल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हावलदिल झाला असून हातात तोंडाला आलेले पीक वाळून चालले आहेत, फिटरवर 10 mva चा ट्रांसफार्मर तात्काळ बसून पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा तात्काळ चालू करावा अन्यथा आठ दिवसात विद्युत पुरवठा सुरू न झाल्यास शेती पिकाचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असेल अन्यथा शेतकऱ्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धारूर चौकात विद्युत महावितरण च्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन यांनी जिल्हा अधिकारी बीड ,विद्युत महावितरण विभाग बीड उपअभियंता उपविभाग केज यांना दिलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.या वेळी भाई अशोक रोडे शेतकरी अशोक कदम निजामोदीन हारणमारे एडवोकेट शंकर पाखरे मधुकर पटेकर जयवंत देशपांडे सुरेंद्र राऊत राजेभाऊ सत्वधर कांता ससाने जीरभाई हारणमारे वेंकट सत्वधर गणेश लोंढे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!