आपला बीड जिल्हाआपले केज

साईड देण्यावरून ,रुग्ण घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला मारहाण : आठ ते नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

वादळवार्ता/गौतम बचुटे

आजारी व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना समोरील वाहनाला साईड देण्यासाठी हॉर्न वाजवून इशारा केला म्हणून त्याचा राग आल्याने रुग्ण घेऊन जाणाऱ्या चालकास रस्त्यात अडवून आठ ते नऊ जणांनी जबर मारहाण केली.

या बाबतची माहिती अशी की, दि. १९ सप्टेंबर रोजी अविनाश ढोबळे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडी क्र. (एम एच-२३/ ए डी-३७२५) या गाडीने आबासाहेब घुटे यांच्या मुलीला घेऊन अंबाजोगाई येथे दवाखान्यात जात होते. दुपारी ४:०० वा. च्या सुमारास ते विडा ते सांगवी पाटी दरम्यान कल्याणवाडी जवळ आले असता; त्यांच्या समोर एक कार सावकाश चालत होती. म्हणून अविनाश ढोबळे याने साईड देण्यासाठी त्याला हॉर्न वाजवून इशारा केला. त्याचा समोरील वाहनातुन जात असलेल्या रामेश्वर मुंडे व सुरेश मुंडे यांना राग आला व वाहनाचे खाली उतरून अविनाश ढोबळे यांच्या वाहना जवळ आले. रामेश्वर मुंडे हा अविनाश ढोबळेला म्हणाला की, तु हॉर्न का वाजवला ? असे म्हणुन गाडीची चावी काढुन गचुरे धरुन गाडीचे खाली ओढले. त्यानंतर सुरेश मुंडे याने अविनाशचा हात धरला आणि रामेश्वर याने मारहाण केली. त्या नंतर देवगाव कडुन एक पांढ-या रंगाची स्कार्पीओ आली त्यातून स्कार्पीओ मधुन विजय आप्पाराव मुंडे, ज्ञानेश्वर वासुदेव मुरकुटे, (रा. देवगाव), पप्पु देविदास तांदळे (रा. हिवरा पहाडी) व इतर तिन ते चार इसम हातात लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन खाली उतरले. त्यांनी अविनाश व भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अविनाश ढोबळे यांच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच रामेश्वर याने अविनाश घोबळे यांच्या आईला ओढुन ढकलुन दिले. रामेश्वर याने अविनाच्या आईला शिवीगाळ केली. तसेच अविनाश याचा लहान भाऊ शुभम यास वरील सर्वांनी लाठ्या काठ्यांनी लोखंडी रॉडने पाठिवर, हातावर, डोक्यावर ठिकठिकाणी मारहाण केली. त्यानंतर गर्दी जमा झाल्याने सदर सर्व इसम पळुन गेले.

या प्रकरणी अविनाश ढोबळे यांच्या फिर्यादी वरून रामेश्वर चंदनशिव मुंडे, सुरेश चंदनशिव मुंड, विजय आप्पाराव मुंडे, ज्ञानेश्वर वासुदेव मुरकुटे सर्व (रा. देवगाव) पप्पु देविदास तांदळे रा. (हिवरापहाडी) आणि तीन ते चार अनोळखी यांच्यासह आठ ते नऊ जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. २० सप्टेंबर रोजी गु. र. नं. ५६२/२०२३ भा. दं. वि. १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ३(२)(व्ही ए), ३(१)(आर), ३(१)(एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!