वादळवार्ता – केज
केज दि.२९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी विभाग अंतर्गत असलेल्या अंगणवाडीताई,मदतणीस,मिनी अंगणवाडीच्या जागा ब-याच दिवसा भरल्या जात नव्हत्या म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चेअरमण लताताई इंगळे यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असून केज तालुक्यातील परितक्त्या महिला,विधवा महिला,घटस्फोटीत महिला व गरजूनी महिलांनी २७ जून ते ७ जूलै पर्यंत अर्ज दाखल करावेत असे आवाहन चेअरमन लताताई ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले आहे.
केज एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी विभाग अंतर्गत असलेल्या अंगणवाडीताई, मदतणीस,मिनी अंगणवाडीच्या जागा ब-याच दिवसा भरल्या जात नव्हत्या म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चेअरमण लताताई ज्ञानेश्वर इंगळे यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असून महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत नविन मिनी अंगणवाडी, अंगणवाडीताई,मदतनीस अशा एकूण ८५ जागा भरल्या जाणार आहेत यासाठी असणाऱ्या सर्व कागदपत्र परिपूर्ण असलेले अर्ज केज पंचायत समिती कार्यालयात २७ जुन ते ७ जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. एकुण ८५ जागा असुन पंचायत समिती गटविकास अधिकारी,तहसीलदार व आमदार हे या जागाची पदभरती करणार असल्यामुळे आपापल्या गावात कोणती जागा आहे हे पाहून पात्र व गरजू लाभार्थी महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन चेअरमन लताताई ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!