आपला बीड जिल्हा

केज पोलीसांनी जप्त केलेला गुटखा जाळला

एकूण ३६ लाख ९३ हजार ३५ रुपयांचा गुटखा जप्त झाला होता

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

बेकायदेशीर रित्या विक्री होणाऱ्या गुटख्या विरोधात केज पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेत गेले काही दिवसात ३६ लाख ९३ हजार ३५ रुपयांचा गुटखा जप्त केला सदरील जप्त केलेला गुटखा न्यायालयाच्या आदेशानंतर दि.९ जुलै रोजी जाऊन नष्ट केला आहे.यावेळी केज पोलिसांसह काही पंचांना घटनास्थळी बोलवण्यात आली होते.

गेल्या अनेक दिवसापासून केस पोलिसांकडून विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात छापे मारले होते. सन२०२१ पासून जुलै २०२२ पर्यंतचा विविध सहा ठिकाणी छापे मारण्यात आले होते. यामध्ये अनेक कंपनीचा गुटखा,सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली होती.एकूण ३६ लाख ९३ हजार ३५ रुपयांचा मुद्देमाल जमा झालेला होता.अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर अन्नभेसळ प्रशासन अधिकारी गायकवाड,केज पोलीस आणी पंचाच्या समक्ष सदरील गुटखा आज रोजी जाळून नष्ट करण्यात आला.यावेळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!