केज । प्रतिनिधी
ग्रामीण तथा शहरी भागातील प्रत्येक खेळाडूंचे एक स्वप्न असते ते म्हणजे आपल्या गावामध्ये किवा तालुक्याच्या ठिकाणी एखादे क्रीडा संकुल असावे. त्यामध्ये विविध खेळ खेळावे व आपल्या गावाचे तथा तालुक्याचे नाव देशपातळीवर लौकिक करावे. याच खेळाडूंच्या भावनांचा विचार करत केजच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिता मुंदडा यांनी केज तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी,खेळाडूंसाठी क्रीडा संकुल असावे म्हणून प्रयत्न सुरू केले त्याचा पाठपुरावा केला आणि त्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर करून आणले. ते भव्य दिव्य क्रिडा संकूल पिसेगाव येथे होणार आहे.
त्या क्रिडा संकूलनामध्ये १)आउटडोर खेळ:,क्रिकेट, फुटबॉल ,हॉकी,टेनिस, बास्केटबॉल २) इंडोर खेळ:टेबल टेनिस ,बॅडमिंटन , चेस्टर ,कॅरम ,लूडो ३) खेळ:वॉलीबॉल कबड्डी रग्बी फुटबॉल ,क्रिकेट ४)व्यक्तिगत खेळ : टेनिस ,बॅडमिंटन, टेबल टेनिस ,गोल्फ आदि खेळ खेळले जाणार आहेत व यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुनांना वाव मिळणार असुन यामुळे भविष्यात केज तालुक्यातील शालेय विद्यार्थी तथा खेळाडु देशपातळीवर आपले नाव तथा केज तालुक्याचे नाव लौकिक करणार आहेत असा मनोभाव आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!