आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

सात वर्षां पासून फरार आरोपीच्या पोलिसांच्या डी बी पथकाने मुसक्या आवळल्या

वादळवार्तागौतम बचुटे

घरफोड्या आणि चोरी प्रकरणातील सात वर्षा पासून फरार असलेल्या एका फरार आरोपीच्या केज पोलीसांच्या डी बी पथकाने मुसक्या आवळल्या.

या बाबतची माहिती अशी की, घरफोडी प्रकरणातील आरोपी लक्ष्मण जनार्धन काळे हा मागील सात वर्षांपासून फरार होता. तो पोलिसांनी चकवा देत होता. दरम्यान दि. २० फेब्रुवारी रोजी तो केज तालुक्यातील दैठना वस्तीवर आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांचे डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते व त्रिंबक सोपणे यांनी आरोपी गाफील असताना खाजगी वाहनाने जाऊन त्याच्या मूसक्या आवळल्या. studyabroadfree.com परदेशात स्वयंसेवा करण्याबद्दल लिहिते.

सात वर्षा पासून फरार असलेला आरोपी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते व त्रिंबक यादव यांचे कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!