वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील टाकळी येथे चुलीवर चहा करताना भाजल्याने एका वृद्ध महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. फेब्रुवारी रोजी टाकळी ता. केज येथे सरुबाई विश्वनाथ बारगजे वय ९० वर्ष ही वृद्ध महिला चुलीवर चहा बनवीत असताना तिचे अंगावरील लुगड्याचा पदर चुलितील जाळावर पडुन तिची साडीने पेट घेतल्याने त्यात ती गंभीर भाजली होती. तिच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नितीन सुंदरराव बारगजे यांच्या माहिती वरून दि. ३ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ११/२०२३ फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १७४ नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस कॉन्स्टेबल शेख हे पुढील तपास करीत आहेत.