आपले केजक्राईम

केज पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून केजमध्ये मटक्याचा बाजार ; पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प !

केज । प्रतिनिधी

मटका हा एक प्रकारचा सट्टा असून तो समाजासाठी अत्यंत घातक आहे. आज केजसारख्या लहानशा शहरातही हा सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रशासनाच्या नाकावर टिचून खुलेआम चालत आहे. समाजातील तरुण पिढी या जाळ्यात अडकत असून अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.केज शहरात काही ठिकाणी लपूनछपून, तर काही ठिकाणी सर्रासपणे मटका खेळला जातो. या अड्ड्यांना स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींचे संरक्षण मिळते, असा आरोप नागरिक करतात. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या सट्टा व्यवसायाला आणखीनच बळ मिळत आहे.या सट्ट्यामुळे तरुण वर्ग भरकटत आहे. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करण्याऐवजी “लवकर पैसे मिळवण्याचा” भ्रम या माध्यमातून त्यांच्या मनात तयार होतो. अनेक तरुण मटक्यात पैसे घालवून कर्जबाजारी झाले आहेत. काहीजणांनी मोबाईल, दुचाकी, दागदागिने विकून मटका खेळला आहे. त्यांच्या या सवयीमुळे घरातील आर्थिक परिस्थिती ढासळते. परिणामी, कुटुंबातील वाद, हिंसाचार, महिला अत्याचार या समस्या उद्भवतात.या सर्व प्रकाराकडे प्रशासन, पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांच्या मते, ही यंत्रणा हाताशी धरूनच हा गोरखधंदा चालतो. ही बाब अत्यंत गंभीर असून समाजाच्या मुळावर घाव घालणारी आहे.मटक्याचा व्यवसाय केवळ आर्थिक नुकसान करतो असे नाही, तर तो नैतिकदृष्ट्याही समाजाला भ्रष्ट करतो. मेहनतीने कमावण्याची सवय मोडून टाकतो, आणि फसव्या आशांमध्ये आयुष्य बर्बाद करतो. म्हणूनच या व्यवसायावर तात्काळ बंदी घालून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.सट्टा आणि मटक्याच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला वाचवण्यासाठी प्रशासनाने जागरूक होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही सजग राहून अशा कृत्यांचा विरोध करायला हवा. मटका हा केवळ एक खेळ नाही, तर तो समाजातील अनेकांचे भविष्य अंधारमय करणारा एक सामाजिक रोग आहे जो वेळेत थांबवणे अत्यावश्यक आहे.

पोलीस प्रशासन गप्प का? केज मधील स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, दररोज उघडपणे सुरु असलेले हे जुगार केंद्र प्रशासनाच्या नजरेस का पडत नाही? गल्ली बोळामध्ये, हॉटेलमध्ये , प्रशासनाच्या दारात , जर आकड्यावर मोठ्याप्रमाणात पैसे लावले जातात तर सर्वसामान्यास दिसते तर पोलिसांना दिसत नाही का ? काहींनी असा संशयही व्यक्त केला आहे की, पोलीसांच्या आशीर्वादानेच हा गोरखधंदा चालतो आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!