वादळवार्ता – केज
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणार्यां पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो आहे. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्भिडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा कार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे… या घटनेचा राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवले जात आहेत.
त्यातच केज तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने काळ्या फिती लावत सदरील घटनेचा निषेध नोंदवुन आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदयानुसार गुन्हा दाखल करावा, खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत ) व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अश्या मागणाचे निवेदन केज तहासिलचे नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्याकडे केली आहे. सदरील निवेदनावर पत्रकार डॉ हनुमंत सौदागर , पत्रकार मधुकर सिरसट , पत्रकार संतोष गालफाडे ,पत्रकार महादेव गायकवाड़ ,पत्रकार विजयराज आरकडे, पत्रकार गौतम बचुटे ,पत्रकार सुनिल गलांडे, पत्रकार अशोक सोनवणे, पत्रकार रामदास तपसे , पत्रकार अजय भांगे , पत्रकार मुबशीर खतीब , पत्रकार धनजंय कुलकर्णी, पत्रकार महादेव काळे, पत्रकार हनुमंत भोसले , पत्रकार रमेश गुळभिले , पत्रकार विनोद शिंदे, पत्रकार बाबासाहेब मस्के , पत्रकार बालासाहेब जाधव , पत्रकार सुहास छिद्रवार, पत्रकार इकबाल शेख , पत्रकार धनजंय घोळवे , पत्रकार सनी , पत्रकार तात्या गवळी , पत्रकार शाहेद खतीब , पत्रकार विनोद ढोबळे आदि पत्रकार उपास्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!