वादळवार्ता – बीड
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) बीड अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या अमलबजावणीसाठी दि. २५ ते २७ मार्च २०२३ पर्यंत “नवतेजस्विनी महोत्सव २०२३” अंतर्गत स्वयंसहाय्य महिला बचतगट उत्पादित वस्तू/मालाचे विक्री-प्रदर्शन चे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून मा न्यायाधीश सिद्धार्थ गोडबोले उपस्थित होते. 
मा जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात आपल्या सणा आवश्कतेनुसार बचत गट चे स्टॉल आयोजित करावे, स्थानिक गरजनुसार बचतगटाच्या उत्पादनात वाढ करावी. तसेच सध्याच्या ऑनलाईन मार्केट मध्ये पण बचत गटाने आपले प्रोडक्ट तयार करण्यासाठी आवाहन केले आहे. मार्केट मध्ये आयोजित करण्यात आले आहे. माविम बँक कर्ज मिळवून देण्यासाठी व परतफेड करण्यासाठी प्रशसनीय काम करत आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी माविमचे अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाला नाबार्ड जिल्हा विकास अधिकारी टी.एल.मारकड , माविम चे विभागीय अधिकारी उमेश कहाते, आत्मा प्रकल्प संचालक सुभाष साळवे, ICICI चे विभागीय अधिकारी प्रशांत सिन्हा, समाज कल्याण अधिकारी रविंद्र शिंदे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतिश खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या नवतेजस्विनी महोत्सव मध्ये जिल्ह्यातील विविध प्रकारचे ३५ स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये विविध प्रकारचे मसाले,पापड,लोणचे, ज्वारी,बाजरी, डाळी, कडधान्य, भाजीपाला, शोभेच्या वस्तू, लोकरी व मायक्रोन च्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विविध खाद्य पदार्थ , घान्याचे तेल, दही धपाटे इत्यादि माल विक्री साठी उपलब्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविम जिल्हा समन्वय अधिकारी एस बी चिंचोलीकर यांनी केले, तर आभाप्रदर्शन रामकवर आंधळे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी सी आर मुंजेवार, मॅनेजर वैशाली नाईकनवरे, उषा राठोड, सविता औटे, मिना कांबळे रामकवर आंधळे आणि सर्व सह्योगीनी, माविम स्टाफ, सामजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, अशोक तांगडे यांनी प्रयत्न केले.
बीड शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी दि २५ ते २७ मार्च २०२३ पर्यंत “नवतेजस्विनी महोत्सव २०२३” अंतर्गत स्वयंसहाय्य महिला बचतगट उत्पादित वस्तू/मालाचे विक्री-प्रदर्शन चा लाभ घ्यावा,असे आवाहन माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री एस.बी.चिंचोलीकर यांनी केले आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!