आपले केजशिक्षण

मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेतुन बीड जिल्ह्यातुन साने गुरुजी निवासी विद्यालय केज प्रथम,तर केज तालुक्यातुन जि.प.मा.शा.भाटुंबा,विठ्ठल विद्यालय सारणी प्रथम

केज (प्रतिनिधी)

23/06/25 रोजी पंचायत समिती कार्यालय केज च्या सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा– 02 चे तालुका व जिल्हा स्तरावरचे बक्षीसवितरण गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी बोलताना श्रीमती दिवाणे मॅडम यांनी तालुक्यातून व जिल्ह्यातून आलेल्या सातही शाळांचे ,डिजिटल धनादेश ,ट्रॉफी, सन्मानपत्र व पुस्तक देऊन अभिनंदन केले.ं तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गुणात्मकता सुधारण्यास मदत होते . शासनाने राबवलेल्या विविध स्पर्धेमधून गुणात्मक दर्जा, भौतिक सुविधा ,विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनत आहेत . याचा आनंद होतो आहे प्रत्येक शाळेतून उपक्रम राबवले जाणे गरजेचे आहे. तसेच बक्षीस प्राप्त शाळांनी आपल्या जवळच्या इतर शाळांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेतल्यास इतर शाळांना देखील समृद्ध बनण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.लक्ष्मणजी बेडसकर साहेब हे होते. प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून केज बीटातील पाच शाळा स्पर्धेत पात्र ठरले आहेत याचा मला अभिमान आहे असे सांगितले.तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे तालुक्याचे समन्वय श्री सुनील केंद्रे सर यांनी कार्यक्रमाचे सविस्तर प्रस्ताविक केले.यावेळी प्राचार्य डॉ .कविता कराड-गीते , मुख्याध्यापक डॉ .शंकरराव कंचनवार ,सचिन हंगे,भागवत सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा सिरसाट मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्रूबा सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमास केज तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख ,केंद्रीय मुख्याध्यापक व बक्षीस प्राप्त शाळांचे सर्व शिक्षण उपस्थित होते.

जिल्ह्यातून सर्वप्रथम आलेली शाळा :साने गुरुजी निवासी विद्यालय केज 11 लक्ष रुपये प्रथम पारितोषिक ,तालुक्यातून खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा : सर्वप्रथम विठ्ठल विद्यालय सारणी सांगवी तीन लाख रुपये ,द्वितीय प्राथमिक आश्रम शाळा टाकळी दोन लक्ष रुपये :तृतीय गणपतराव मोराळे इंग्लिश स्कूल नांदुर घाट एक लक्ष रुपये ,सरकारी व्यवस्थापन :प्रथम जिल्हा परिषद हायस्कूल भाटुंबा तील लक्ष रुपये ,द्वितीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तांबवा दोन लक्ष रुपये ,तृतीय जिल्हा परिषद शाळा शिंदी एक लक्ष रुपये एवढी पारितोषिक मिळाले आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!