वादळवार्ता वार्तांकन – गढी
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, गढी येथे हिंदी विभागाच्यावतीने “हिंदी साहित्य का इतिहास- अतिथी व्याख्यान” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वा.सावरकर महाविद्यालय बीड येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश झंवर हे उपस्थित होते. तर अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सदाशिव सरकटे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा.ओमप्रकाश झंवर यांनी हिंदी साहित्य आपल्याला संस्कृती, गौरव व वैभव परंपरेची माहिती देते. प्राचीन काळ ते आधुनिक काळामध्ये हिंदी साहित्यकारांचे व हिंदी साहित्याचे महत्त्व विशद केले. साहित्य आपल्याला जीवनातील चढ-उतारावर मात करून जगायचे कसे ते शिकविते असे मत मांडले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे साहित्याचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.साहित्य रुपात उपलब्ध असलेल्या इतिहासावरून मनुष्य वर्तमान व भविष्याचा विचार करून आपले जीवन आनंदमय बनवू शकतो असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख व संयोजक प्रा. डॉ. संतोषकुमार यशवंतकर यांनी केले. सूत्रसंचालन हिंदी विभागाच्या प्राध्यापिका व संयोजक प्रा.हिरा पोटकुले यांनी केले तर विद्यार्थिनी कु.वैष्णवी जाधव हिने आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील हिंदी विषयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!