Uncategorized

जागेचे खरेदी खत होऊनही केज नगर पंचायतने नोंदणीला घातला खोडा !

वादळवार्ता वर्तांकन – शाहेद खतीब

पै-पै जमवून जागा खरेदी करून त्याची रितसर खरेदी खत करून त्याची ७/१२ व ८-अ या महसूल अभिलेख्याला नोंदी घेऊन देखील केज नगर पंचायतीने त्याची नोंद नगर पंचायतीच्या मालमत्ता अभिलेख्याला घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे खरेदीदार हे अन्याया विरुद्ध उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार आहेत.

 

या बाबतची माहिती अशी की, केज बीड रोड लगत केज येथील शिक्षक कॉलनीत जालिंदर बारगजे व सौ. जयश्री बारगजे या पती-पत्नीनी गट नंबर १८/२ मध्ये दि. सन २०२० रोजी दुय्यम निबंधक कार्यालय केज येथे खरेदी खत क्र. अनुक्रमे २६८१/२०२० आणि २६८०/२०२० द्वारे खरेदीखत केले आहे. त्या आधारे दि. ४/२/२०२० फेरफार क्र.३६४३ नुसार खाते क्र. ५५६७५ व ५०२८२ नुसार गाव नमुना ७/१२ व ८-अ ला नोंद घेण्यात आली. त्या नुसार जयश्री बारगजे व जालिंदर बारगजे यांनी दि. ४/१२/ २०२० रोजी केज नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना सदर भूखंडाची नोंद नगर पंचायतीच्या मालमत्ता रजिस्टरला नोंद घेण्या संदर्भात अर्ज दिला. तसेच त्या संदर्भात दि. ५/९/२०२१ रोजी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर अझहर चाँदपाशा इनामदार यांनी आक्षेप नोंदविला होता. त्या आक्षेपावर दि. २७/८/२०२१ रोजी सदर प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. त्यावर मुख्याधिकारी यांनी नगर पंचायतीचे अभियोक्ता ॲड. प्रवीण मेटे यांच्याकडे कायदेशीर मार्गदर्शन मागविले. त्यावरअभियोक्ता ॲड. प्रवीण मेटे यांनी दि. १७/११/२०२१ रोजी या भूखंडाची नोंद खरेदिदारांच्या नावे घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिलेला होता; परंतु अद्यापही सदर भूखंडाची नोंद केज नगर पंचायतीने घेतलेली नाही. म्हणून जालिंदर बारगजे व जयश्री बारगजे यांनी दि. ४/७/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी बीड यांना एका निवेदनाद्वारे सदर नोंदणी ही राजकीय दबावापोटी नगर पंचायतीने रोखली असून नगर पंचायतीच्या अडवणुकीच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई समोर दि. २० जुलै रोजी जालिंदर बारगजे, सौ. जयश्री बारगजे हे त्यांच्या कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसणार आहेत.

निवेदनाच्या प्रती मा. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केज यांना देण्यात आल्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!