वादळवार्ता – केज
बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा व्हावा यासाठी स्व.विमलताई मुंदडा यांनी सर्वोतपरी प्रयत्न केला.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कार्यालयाची उभारणी शहरात अद्ययावत झाली मात्र आंबेजोगाई जिल्हा निर्मितीचा निर्णय प्रलंबित आहे. वर्षानुवर्षे हे भिजत घोंगडे कायम आहे. मात्र आता परत एकदा अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी जनआंदोलन उभारत आहेत. केजकरांनी देखील यात उडी घेत जिल्हानिर्मितीची मागणी केली आहे.
या संदर्भांत केजचे नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले . वाढती लोकसंख्या,वाढती गरजा पाहता अंबाजोगाई जिल्हा लवकरात लवकर करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर भाई मोहन गुंड, पत्रकार धनंजय कुलकर्णी, पत्रकार रामदास तपसे,राहुल खोडसे, पत्रकार महादेव गायकवाड, पत्रकार हनुमंत सौदागर, पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार साजेद इनामदार, चालक प्रमोद पांचाळ,सुग्रीव करपे, पंडित चाळक, खोडसे रोहन, शार्दुल कुलकर्णी, नितीन गुजर यांच्यासह इतर स्वाक्षरी आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!