आपला बीड जिल्हाक्राईम

दहा लाख रु साठी विवाहितेचा सासरी छळ : पती आणि सासू सासऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील पिराचीवाडी येथे येथे ट्रक घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रु घेऊन ये म्हणून तिचा सासरी छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारी वरून तिचा नवरा सासू सासरे यांच्यासह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, शितल प्रकाश सिरसाट हिचा तिच्या सासरी पिराची वाडी ता. केज येथे नवरा सासू सासरे दीर व जावा यांनी तिला१० जानेवरी ते २५ सप्टेंबर दरम्यान चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला आणि जर नांदायचे असेल तर ट्रक घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रु घेऊन ये म्हणून छळ करून त्रास दिला.

विवाहिता शितल प्रकाश सिरसट हिने केज पोलिस ठाण्यात दि. २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारी नुसार गु. र. नं. ४३९/२०२२ भा. दं. वि. ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार नवरा प्रकाश बंडु सिरसट, सासू तारामती बंडु सिरसट, सासरे बंडु शाहु सिरसट, दिर संतोष सिरसट व बंडु सिरसट, जाऊ रत्नमाला रमेश सिरसट आणि उषा संतोष सिरसट सर्व रा. पिराचीवाडी ता . केज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!