वादळवार्ता वार्ता – केज
केज शहरातील विजय स्पोर्टस् अकॅडमी संचलित योगा क्लासेसचे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन अंकुशराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक राहुल देशमुख हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ वासुदेव नेहरकर, नगसेवक सोमनाथ गुंड, दिलीपराव गुळभिले , अशोक मस्के , संजय गुंड , नेहरकर सर , ठोंबरे सर , बोरडे सर पत्रकार भांगे सर , तळेकर सर तोंडसे सर , मुंडे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातील ओम प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार संभारभाचा कार्यक्रम पार पडला.


यानंतर योग शिक्षीका जयश्री गुंड यांनी योगाचे विद्यार्थ्यासमवेत प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रिडा संयोजक विनोद गुंड यानी केले तसेच डॉ. नेहरकर , अंकुशराव इंगळे ,मस्के सर यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप राहुल देशमुख यांनी केले.

सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन गिरी सर यांनी केले तर आभार ठोबरे सर यांनी मानले.

हा कार्यक्रम विद्याधन बालविद्यालयामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमास कोरडे मॅडम , बोरडे मॅडम , घुले मॅडम , डोईफोडे मॅडम यावेळी अनेक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!