आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

घरबसल्या व्यवसाय करा ; हजारो , लाखो रुपये कमवा

सावधान ! फसव्या व्यवसायाच्या जाहिरातीला बळी पडु नका ; आपली होऊ शकते मोठी फसगत

केज येथील एका गरीब सलूनवाल्याला पॅकींग व्यवसायापाई हजारो रुपायांना गंडवले

यु – ट्युबवर एका यु-ट्युबरने दिली होती जाहिरात 

वादळवार्ता – केज

हल्ली यु – ट्युबवर, फेसबुक , सोशल मिडिया व्दारे अनेकजन फसव्या जाहिराती देऊन सर्वसामान्य माणसांना फसवत आहेत. वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातुन घरबसल्या व्यवसाय करा हजारो लखो रुपये कमवा आशा जाहिराती देऊन नंतर सर्वसामान्य माणसांना गंडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि केज शहरामध्ये बीड रोड लगत स्वागत हॉटेलच्या बाजुस असणारे जयवंत केरबा झेंडे यांचे ज्ञानेश्वर कंटिंग सलून आहे . त्यांचा मुलगा उत्रेश्वर जयवंत झेंडे वय वर्ष १७ याला आपल्या वडिलांना हातभार लावावा, त्यांच्यावरचा कांही भार आपण उचलावा या हेतुने शिक्षण शिकत घरातुन एक व्यवसाय करावा असे वाटले.

त्यांने आपल्या वडिलांना याची कल्पना दिली . वडिलानी परवाणगी दिल्या नंतर मुलाने घरबसल्या छोटा व्यावसाय कोणता करावा मग सुरु झाला यु-ट्युबर शोध असंख्य व्यावसायाचे व्हिडीओ बघीतल्या नंतर मुलांने घरबसल्या पेन पँकींग व्यवसायाचा व्हिडीओ निवडला. वडिल घरी आल्यानंतर मुलाने सर्व प्रकार सांगितला आणी त्या व्हिडिओ वरुण एक नंबर घेऊन व्हाट्अँप व्दारे संपर्क साधला. त्या दोघाना कल्पना देखील नव्हती ते एका ठगाला फोन वरून संपर्क करत आहेत.

फोनवर आयडी कार्ड आणी इतर फिस ६५० सांगण्यात आली. त्यासाठी आधार कार्ड मागणीनुसार पाठवण्यात आले .जयवंत झेंडे यांनी मागणी केलेले पैसे फोन-पे व्दारे तात्काळ पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना एक ओळखपत्र बनवुन पाठवण्यात आले त्यांना सांगण्यात आले कि तुमच्या आधार कार्ड पत्यावर आता तुम्हाला पेन पॅकींग करिता लागणारे सर्व साहित्य व १५००० रुपये पाठवण्यात येणार आहे. मालाची गाडी जवळ आली आहे परंतु गाडी येण्याअगोदर तुम्हला ३१००+५० रुपये पाठवावे लागतील. त्यानंतर लगेचच ३१५० रुपये पाठवण्यात आले. त्यांना परत मेसेज पाठवला कि तुम्ही गडबड केली ३१०० रुपये वेगळे व ५० रुपये वेगळे असे पाठवा जर पाठवले नाही तर तुमचा माल तुम्हाला मिळणार नाही म्हणुन परत ३१०० वेगळे व ५० वेगळे असे पैसे पाठवण्यात आले. त्यांना परत मेसेज आला कि आता तुम्हाला कंपनीचे सभासद केले आहे . त्यासाठी ४९९९ रुपये पाठवा तुम्हाला भरपुर पैसा मिळणार आहे. परत ४९९९ पाठवले गेले. झेंडे व त्याच्या मुलांन अगदी तळमळीने विचारले साहेब माल किती वेळाने मिळेल. आता शंकर टक्के तुम्हाला माल मिळुन जाईल फक्त ७२०० रुपये पाठवा. यावर गडबडुन जाऊन झेंडे यांच्या लक्षात आले कि आपली फसगत झाली आहे. त्यावर त्यांनी त्याला विचारले कि मला व्यवसाय करायचा नाही मला माझे पैसे परत हवे आहेत त्यावर त्या ठगाने तु जर पैसे दिले नाहीस तर तुझ्या आधारकार्डच्या नंबरवर लोन उचलून खर्च करू म्हणुन धमकी दिली. आशा परिस्थितीमध्ये झेंडे यांनी वादळ वार्ताशी संपर्क साधुन मला ११९५० रुपयांना फसवल्याची सारी कैफीयत सांगीतली. व लवकरच ते ठगा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!