आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

एस टी बसची स्टेअरिंग धरून प्रवाशाने केली चालका सोबत अरेरावी !

वादळवार्ता – गौतम बचुटे

एसटी बस गावात का घेत नाहीत आणि गाडी काय तुमची आहे काय असे म्हणीत चालक व वाहकासोबत अरेरावी करून एसटी बस चे स्टेअरिंग धरून अडथळा केल्याची घटना घडली आहे .

दि. १२ ऑगस्ट केज ते वरपगाव ही धारूर आगाराच्या एस टी बस क्र. (एम एच-२०/बी एल-०७८९) वरपगाव गाडी दुपारी २:३० वा. वरपगाव येथे पोहोचली त्यावेळी याच गाडीने केज ते वरपगाव या गाडीने प्रवास करीत असलेला प्रवाशी संतोष दगडू बनसोडे हा चालक भिमराव किसन शिंदेआणि वाहक परमेश्वर भिमराव मुंडे यांना म्हणाला की, ही गाडी गावात का घेऊन जात नाहीत गाडी काय तुमची आहे काय ? असे म्हणून त्याने गाडी वळवीत असताना ड्रायव्हर केबिन मध्ये जाऊन गाडीची स्टॅरींग हाताने धरली आणि अडथळा केला. चालक आणि वाहकाने त्याला गावात रस्ता नसल्याने गाडी गावात जाऊ शकत नसल्याचे समजावून सांगितले परंतु तो ऐकत नव्हता.

चालक भिमराव किसन शिंदे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात संतोष दगडू बनसोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!