केज तालुक्यातील नांदूरघाट आणि चिंचोलीमाळी सर्कल मध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस!
शेतातील कामासाठी गेलेले शेतकरी आणि शेतमजूर शेतातच पडले अडकुन!
महादेव काळे/ वादळवार्ता, प्रतिनिधी
रिमझिम पावसानंतर वरुनराजाने काही दिवस विश्रांती घेतली होती. तशी पिके बहारदार आल्याने शेतकरी राजाही आनंदात होता. परंतु पाऊस पडत नसल्याने तो चिंतेत असायचा आज या पिकाला पावसाची अत्यंत गरज होती. ऐन याच समयी आज दि. ७ रविवार दुपारी ३:३० वा. अचानक आभाळभरुन आले आणि विजांच्या कडकडटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दि.७ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी केज तालुक्यातील नांदुरघाट सर्कल मधील शिरुरघाट, नाव्होली, दैठणा, राजेगांव, माळेवाडी यासह चिंचोलीमाळी सर्कल मधील देखील वरपगांव, ऊ.पिंप्री, बोरगाव, कापरेवाडी आदि ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सध्या जोरदार पाऊस सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत देखील हा पाउस सुरुच होता. कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकरी व शेतमजूर आणि पशु यांना पावसाने झोडपून काढले आहे.या पावसात शेतातुन घराकडे येणे शक्य नसल्याने अनेकजण पशुधनासह शेतातच अडकून पडले आहेत. मात्र शेतकरी राजा या पावसामुळे पुरता आनंदीत झाला असुन हा पाऊस या खरिप पिकासाठी वरदान ठरला आहे.



