आपला बीड जिल्हानैसर्गिक

वरुणराजा थांबायचं घेईना नाव ; भ्रांतेत पडलाय बळीराजा कुठे करावी धावाधाव.!

वरुणराजा थांबायचं घेईना नाव ; भ्रांतेत पडलाय बळीराजा कुठे करावी धावाधाव.!
वादळ वार्ता वार्तांकन – महादेव काळे

कमीअधिक पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या सोयाबीन पिकाची पेरणी मृग संपुन जातो की काय ?

म्हणून घाईघाईने पेरणी करून घेतली.मात्र बियाणे खराब म्हणा किंवा जमिनीतील ओल कमी म्हणा बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.

त्यामुळे त्यांना या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. त्या पेरणीतील पिके चांगली जोमदार आली असतानाच केज तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून चांगला दमदार पाऊस पडत असुन जमिनीत आता पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे काल परवा डौलदार दिसणारी कोवळी पिके आता पिवळी पडु लागल्याने बळीराजा चिंतातुर झाला असुन आता कराव कायं ? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.या बाबत अधिक माहिती अशी की या वर्षी खरिप हंगाम अगदी वेळेवर सुरू झाला.अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून पिककर्जासाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु पेरणीसाठी वेळेवर पिककर्ज न मिळाल्याने कोणी ऊसणवारीने,कोणी कर्जावु तर कोणी खाजगी सावकाराकडुन पैशाचा बंदोबस्त करून अनेकांना एकदा नव्हे तर दुबार पेरणी करावी लागली. यावेळी पिके जोमदार आणि चांगली आली असतानाच गेल्या आठ दिवसापासून केज तालुक्यात दमदार पाऊस पडत असुन त्यामुळे शेतातील कोवळी पिके आता पिवळी पडु लागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली असुन पिकासाठी घेतलेले कर्ज आता परत कसे करणार कारण हे पिके जर हातातुन गेली तर करायचे काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावु लागला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!