वादळवार्ता वार्तांकन – कळंब
आपल्या दिवंगत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांची आठवण कायम राहावी आणि त्या निमित्त गोरगरीब व गरजू रुग्णांना सेवा मिळावी म्हणून दर वर्षी प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे आणि त्यांच्या कुटुंबांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरात कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे यांनी साडे पाचशे रुग्णांची तपासणी करून श्रद्धांजली अर्पण केली.
कळंब येथे आशा कान-नाक-घसा हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. आकाश बचुटे हे त्यांच्या मातोश्री कालकथीत आशाबाई बचुटे यांचे दि २८ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले. यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त त्यांचे चिरंजीव आणि प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने हे सन २०१८ पासून दर वर्षी नियमित कान-नाक-घसा यांचे मोफत तपासणी शिबीर आयोजित केले जाते.
दरम्यान सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी कान-नाक आणि घसा संबंधी विविध आजारांचे मोफत तपासणी व उपचार शिबर आयोजित केले गेले. या मोफत शिबिरात डॉ आकाश बचुटे यांनी सुमारे ५५० रुग्णांची तपासणी करून दिवंगत मातोश्री कालकथीत आशाबाई बचुटे यांना आदरांजली अर्पण केली.
या शिबिरात प्रामुख्याने कानाचे विविध आजार ज्यात कानातुन पु-येणे. कानामध्ये सर्दी जमा होणे. कानामध्ये मळ, बुरशी होणे. कानाच्या पडद्यावर छिद्र व कानाची पाळी फाटलेली असणे. जन्मतः कानाचा नासुर कानावरती सुज व गाठी असणे. कानामध्ये सतत आवाज येणे, चक्कर येणे, कमी ऐकु येणे तसेच मुल जन्मतः मुक व बधिर असणे यासह नाकाचे आजार ज्या मध्ये नाकाचे हाड व मांस वाढणे. ॲलर्जी, सर्दी सायनस ही लक्षणे. तसेच डोके व डोळ्यांच्या मध्ये दुखणे. नाकातुन सतत पाणी येणे. दुर्गंध येणे व बाहेरील सुगंध दुर्गंध न समजणे. चेहरा सुजणे व दुखणे. श्वास बंद होणे, नाक कोंदणे, नाकातून रक्तस्त्राव होणे. नाकामध्ये फोड व फुनसी येणे यासह घशाचे आजार यात टॉन्सिल – गाठी असणे. थॉयरॉईड व मानेवर सुज असणे. जिभेवर अल्सर, पांढरे चट्टे असणे. गालावर पांढरे, काळे, लाल चट्टे असणे. ओठांवर व जिभेवर सुज, गाठ येणे. रात्री व दिवसा सतत खोकला येणे, ढास लागणे. लहान मुलांमध्ये नाकाचे टॉसिन्ल असणे. तोंडातील कॅन्सरची गाठ व जखम असणे. सतत आवाज बसणे. आवाज घोगरा येणे. मानेवर विविध प्रकारच्या गाठी असणे. या आजारांची तपासणी करण्यात आली.