वादळवार्ता/गौतम बचुटे
केज येथून एक तीस वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. केज शहरातील समर्थ नगर येथे राहत असलेला अविनाश लक्ष्मण मस्के वय ३० वर्षे हा दि. १६ सप्टेंबर पासुन त्याच्या राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता तरुण अविनाश मस्के याचा रंग गोरा असून उंची साडेपाच फूट आहे. त्याचा चेहरा लांबट, मध्यम बांधा अंगात निळी जिन्स व टी शर्ट असा त्याचा वेश आहे.
या बाबत त्याच्या वडिलांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली असून त्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रोडे हे करीत आहेत. बेपत्ता तरुणा बाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन सपोउनि रोडे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!