आपले केज

केज नगर पंचायत आता नगर परिषद होणार !

केज मध्ये पुन्हा निवडणुका लागणार ?

तपासून कारवाई करा असे आ. नमिताताई मुंदडा यांच्या निवेदनावर उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

वादळवार्ता – गौतम बचुटे

लवकरच केज नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये रूपांतर होण्याच्या हालचाली वाढल्या असून आ नमिताताई मुंदडा यांच्यापत्रावर उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

केज नगर पंचायतीचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत असून केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदन दिले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला तपासून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागाने केज नगर पंचायतीच्या हद्दीत अकृषिक रोजगाराची टक्केवारीच्या बाबतीतील सद्यस्थिदर्शक प्रस्ताव आणि ठोस समर्थनासह तात्काळ माहिती केज नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे मागितली आहे.

आमदार नमिता मुंदडा आणि उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशा नुसार केज नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत झाले तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील की काय ? या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.

ठळक घडामोडी 

दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्र्यांना आ. नमिता मुंदडा यांचे पत्र

दि. ३० जानेवारी २०२३ नगर विकास विभागाचे उपसचिव यांचे पत्र

२ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर परिषद प्रशासन विभागाचे मुख्याधिकारी यांना पत्र

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!