आपला बीड जिल्हाक्राईम

परळी औष्णीक विज केंद्रापासुन 500 मिटरवर स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेले तिघे पोलिसांच्या ताब्यात

वादळवार्ता वार्तांकन परळी वैजनाथ

अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते.परंतु गत दोन वर्षापासून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे केंद्रातून बाहेर पडणार्या राखेची वाहतुक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले गेले.यामुळे औष्णीक वीज निर्मिती केंद्रासच धोका निर्माण झाला.राख उपसा करणार्या राख माफियाकडुन औष्णीक वीज निर्मिती केंद्राजवळच स्फोट करुन राख उपसली जात होती.याच दरम्यान शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास असाच स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे,बॅटरी,वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र परिसरात आमची सुरक्षा नसुन ती औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील सुरक्षा रक्षकांची असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांनी सांगितले.

या तिघांना घेतले ताब्यात 

परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या मारोती काचगुंडे,हरिश्चंद्र तुकाराम जाधव व बालाजी लालु चव्हाण या तिघांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 286 सहकलम 3,भारताचा स्फोटक पदार्थ बाबत अधिनियम 1908 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!