आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
अखेर ‘ती’ अल्पवयीन मुलगी बालसुधार गृहात

वादळवार्ता – गौतम बचुटे
दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. तिची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छे विरुद्ध दि. १६ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यात एका गावात झाला होता. परंतु तिला हे लग्न मान्य नव्हते म्हणून तिने लग्ना नंतर सासरी राहण्यास नकार देताच तिला मारहाण करण्यात आली होती आणि त्यांनतर तिचे वडील, आजोबा व मामा यांनी तिला औरंगाबाद येथे अज्ञातस्थळी सोडून निधून गेले होते त्या नंतर दि. १८ फेब्रुवारी रोजी त्या अल्पवयीन विवाहित मुलीने महिला आणि पुरुष या दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दौलताबाद जि. औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात कथन केल्या नुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर घटना ही केज तालुक्यातील असल्याने दौलताबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद सलगर यांनी हा गुन्हा युसुफवडगाव ता. केज पोलीसांकडे वर्ग केला.
या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी बालविवाहाशी संबंधीत मुलीचे आई-वडील, आजोबा, मामा, नवरा व सासू-सासरे या सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ३६/२०२३ भा. दं. वि. ३२३, ५०४, ३४ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.
ती’ अल्पवयीन मुलगी बालसुधार गृहात :-
बळजबरीने लग्न लावून दिलेली ती अल्पवयीन विवाहित मुलगी हिच्या आई वडील आणि तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे म्हणून तिची रवानगी औरंगाबाद येथील बाल सुधार गृहात करण्यात आली असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद सलगर यांनी दिली.