आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

अखेर 25 वर्षानंतर उमरी रस्त्याचे उद्घाटन ; उमरी रस्त्याच्या संघर्षाची इतिहासात नोंद ?

ग्रामपंचायत पासुन ते आजपर्यंत होती नागरीकांची मागणी त्यासाठी केला संघर्ष…

प्रशासनाच्या काळात केज न.प.चे प्रशासक म्हणुन उपजिल्हा अधिकारी श्री. शरद झाडगे तथा केजचे भुमिपुत्र मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी पाठपुरावा करून पाठवला होता प्रस्ताव त्यावरच आली मान्यता

वादळवार्ता – केज

नगरपरिषद , नगरपालिका ,नगरपंचायत अधिनियम 1965 नुसार शहरातील नागरीकांना प्राथमिक सुविधेमध्ये रस्ता, पथदिवे , स्वच्छ पाणी आदि बाबी महत्त्वाच्या आहेत.त्या करिता मागणी नुसार त्या ठिकाणचे प्रशासन वा सत्ताधारी प्रयत्न करतात. प्रशासनाने ,सत्ताधार्‍याने एकादे काम हातावर घेतले तर ते पूर्ण करण्यासाठी कांही कालखंड लागतो परंतु केज शहरातील जनतेच्या वतीने केलेल्या रस्त्याच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी तब्बल 25 वर्ष लागतात हे केज शहरातील नागरीकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

याबाबत माहिती अशी कि केज शहरातुन जाणाऱ्या उमरी रस्त्याचा प्रश्न मागील पंचेवीस ते तीस वर्षापासुन सुरु होता. या रस्त्याच्या आजुबाजूला रहाणार्‍या नागरीकांना असंख्य आडचणीला सामोरे जावे लागले. त्यासाठी केज संघर्ष समितीचे हनुमंत भोसले सर तथा स्थानिक नागरीकांच्या वतीने एक नव्हे , दोन नव्हे तर तब्बल पंचेवीस ते तीस वर्ष वेगवेगळी अंदोलने करावी लागली. केज शहरातील तत्कालीन पुढारी , आमदार , खासदार , सरपंच , नगराध्यक्ष , ग्रा.प .सदस्य , नगरसेवक, आदिनी या रस्त्याकडे साधे ढुंकुनही बघीतले नाही. त्यासाठी केज न.प. चे प्रशासक म्हणुन उपजिल्हाधिकारी श्री. शरद झाडगे तथा केजचे भुमिपुत्र सचिन देशपांडे प्रशासकीय काळात मुख्याधिकारी म्हणुन केज नगरपंचायतला आले आणी प्रशासकीय काळामध्ये या रस्त्याच्यासाठी सर्व पाठपुरावा करुण मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे उमरी रस्त्यासाठी मजबुती करण आणी सिमेंट क्रॉक्रीट यासाठी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला. मात्र त्यावर कार्यालयीन प्रक्रिया होत नसल्यामुळे परत आंदोलने करावी लागली. केज शहरातील तथा उमरी रस्त्यालगत वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांन मध्ये कुजुबुज सुरू झाली कि ऐवढा मोठा निधी येतो मग विकास गेला कुठे. अशी चर्चा सत्ताधार्‍यांच्या प्रशासनाच्या कानावर गेल्यामुळेच काय की अखेर आज उमरी रस्त्याचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले आसावे. परंतु रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी चालू होणार ? का यासाठीही अंदोलने करावी लागणार ? असे प्रश्न केज शहरातील नागरिकांन मध्ये उपस्थित होत असताना यावेळी मात्र या उमरी रस्त्याची केज शहराच्या इतिहासात विकासपुरुष पुढार्‍यानंपासून दुर्लक्षीत उमरी रस्ता म्हणुन कायमची नोंद झाली यामध्ये कोणतीही शंका नाही .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!