आपला बीड जिल्हाक्राईम

उमरी येथे पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा : ५८ हजार रु च्या मुद्देमालासह ५ जुगारी ताब्यात तर ५ जण फरार

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

 केज पोलिसांनी अवैद्य धंद्याविरुद्ध कंबर कसली आहे. उमरी येथे पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून ५८ हजार रु. च्या मुद्देमालासह ५ जुगारी ताब्यात घेतले.

दि. २३ ऑगस्ट मंगळवार रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे याना खास खबऱ्या कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, केज तालुक्यातील उमरी येथे पत्त्यांचा जुगाराचा खेळ सुरू आहे. या खात्रीलायक माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दबंग पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक राजू गुंजाळ, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा, बजरंग इंगोले यांच्या जुगाराचा खेळ सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारला. पोलीसांनी छापा मारताच पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जाणाऱ्या जुगाऱ्यांचा पोलीस पथकाने शेतात पाठलाग केला आणि पळून जाणारे युवराज आत्माराम मुळे, अनिल तात्याराव मुळे, अशोक नरहरी कसबे, बाप्पा उर्फ पंढरी मनोहर राऊत आणि नरसिंग भास्कर मुळे या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तर साधुराम भैरट, विलास मगर मुळे, दिनकर अभिमान कसबे, खंडू अभिमान कसबे आणि भास्कर अभिमान मुळे हे पाच जण पळून गेले होते.

या छाप्यात यांच्या कडून रोख १८ हजार ५३० रू. व ४० हजार रू. किमतीच्या दोन मोटार सायकली असा एकूण ५८ हजार ५३० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलेले युवराज आत्माराम मुळे, अनिल तात्याराव मुळे, अशोक नरहरी कसबे, बाप्पा उर्फ पंढरी मनोहर राऊत, नरसिंग भास्कर मुळे जुगारी आणि पळून गेलेले इंदर साधुराम भैरट, विलास मगर मुळे, दिनकर अभिमान कसबे, खंडू अभिमान कसबे, भास्कर अभिमान मुळे या १० जुगाऱ्या विरुद्ध पोलीस जमादार त्रिंबक सोपने यांच्या फिर्यादी वरून ठाणे अंमलदार घोलप यांनी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३६१/२०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस अंमलदार दिलीप गित्ते हे करीत आहेत.

केज पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस कर्मचारी यांच्या साहाय्याने अवैद्य धंद्यावर कारवाया करण्याचा सपाटा लावला असल्याने नागरिकांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!