आपला बीड जिल्हाआपले केजराजकारण
दिल्लीतील राजकारणाला वैतागुन कपिल मस्केचा केज तालुक्याचे नेते बजरंग सोनवणेंच्या मार्गदर्शनाखाली स्वाभीमानी प्रवेश…

वादळवार्ता – केज

वादळवार्ता – केज
याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील फुलेनगर भागात ज्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे कोणतेही नामोनिशान नसताना अगदी एक – एक कार्यकर्ता कॉग्रेस पक्षाशी प्रमाणीक पणाने जोडत राजकारणानामध्ये पाउल ठेवणारा एक कार्यकर्ता कपिल मस्के याने सन २००९ मध्ये नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादक करून केज नगर पंचायत मध्ये नगसेवक म्हणून निवडुन आले .
त्यानतंर त्यानी मागे वळुन न बघता स्वःताचे नेतृत्त्व सिद्ध करत २०१२ मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या निवडणुकीत बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली तसेच २०१४ मध्ये प्रभाग क्रमांक ७ व ९ मध्ये दोन ओबीसी आरक्षण सुटलेले असताना नगरसेवक म्हणुन कबीर इनमादार व सौ.दिपाली डोगंरे यांना निवडुन आणुन प्रभाग क्र. ७ चे नगसेवक कबीर इनमादार यांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्यामध्ये त्यांचा सिहांचा वाटा होता .
तसेच फुले नगर येथील सौ. अजंली रामराव घाडगे यांना विधानसभेची उमेदवारीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते. मात्र केज नगरपंचायतीच्या २०२१- २२ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये पराभव झाला. परंतु तरी देखील त्याचा विश्वास , श्रद्धा कॉंग्रेस पक्षावरती कमी झाली नाही नव्हती त्यांनी त्यांच हिरीरीने काम करण्यास सुरुवात केली. मात्र या निवडणुकीच्या नंतर जनविकास परिवर्तन आघाडी सोबत काँग्रेस पक्षाने दिल्लीवरून सत्तेसाठी युती केल्यामुळे वा आपल्या प्रभाग क्र ७,८,९ चा विकास आधा- अधुरा तथा भ्रष्टाचार संपन्न होतं असल्यामुळे त्यांनी केज तालुक्याचे विश्वासपूर्ण नेतृत्व बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज स्वातंत्र्यदिनी असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केला आहे.निश्चितच त्यांच्या या प्रवेशाने प्रभाग क्रमांक सात, आठ , नऊ चे राजकारण बदलणार असल्याची चर्चा फुलेनगर तथा केज शहरांमध्ये होत आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.