सेवानिवृत्तीमुळे मान्यवराकडून सत्कार संपन्न.
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील मुळ रहिवासी असलेल्या श्रीमती आशा दळवे ह्या आरोग्य सेवेतील सन १९९१ ते २०२१ पर्यंत ३१ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्या.
उपजिल्हा रुग्णालय नांदूरघाट येथे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मुंडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.नागरगोजे मॅडम,कदम सर तसेच रूग्णालयातील सर्व आधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच ३०-१०-२२रोजी श्रीराम मंगल कार्यालय झालेल्या सत्कार समारंभ व सुरूची भोजनाच्या कार्यक्रमाला ए.बी.देशपांडे(मा.वै.आ.ग्रा.रु.केज) डॉ.जाजू सर(मा.वै.आधिकारी), डॉ.तारळकर, डॉ.साखरे संकेत चव्हाण व त्यांच्या सेवा काळातील अनेक कर्मचारी , पत्रकार व दळवे परीवारातील बाबूराव दळवे, दगडू दळवे सह सर्व दळवे परीवाराने सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.उपस्थितांचे आभार बाबूराव दळवे व श्रीमती आशा दळवे यांनी मानले.